दिनविशेष 1 जानेवारी

● १७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.
● १८०८: अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
● १८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.
● १८४२: बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.
● १८४८: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.
● १८६२: इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.
● १८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.
● १८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.
● १८९९: क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
● १९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
● १९०८: संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.
● १९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
● १९२३: चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.
● १९३२: डॉ. नारायण परुळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र सुरु केले.
● १९९५: WTO ची स्थापना झाली.

● १६६२: पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १७२०)
● १८७९: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९७०)
● १८९२: स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)
● १८९४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)
● १९००: आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)
● १९०२: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)
● १९१८: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)
● १९२३: अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री उर्फ टुन टुन यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)
● १९२८: लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. मधुकर आष्टीकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १९९८)
● १९३६: साहित्यिक राजा राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९९७)
● १९४१: चित्रपट कलाकार गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म.
● १९४३: शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.
● १९५०: भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका दीपा मेहता यांचा जन्म.
● १९५१: अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म.

● १५१५: फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचे निधन. (जन्म: २७ जून १४६२)
● १७४८: स्विस गणितज्ञ जोहान बर्नोली यांचे निधन.
● १८९४: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
● १९४४: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १८६९)
● १९५५: भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.
● १९७५: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १८९१)
● १९८९: समाजवादी विचारवंत व पत्रकार दिनकर साक्रीकर यांचे निधन.
● २००९: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)

Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group