दिनविशेष 1 नोव्हेंबर

1000615418

● १६८३: छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे पराक्रम करत पोर्तुगिजांचा पराभव केला.
● १७५५: भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन हे शहर पूर्णत: उद्ध्वस्त झाले. यात सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले.
● १८७०: अमेरिकेतील हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.
● १८४५: भारतातील पहिले आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेजचा मुंबई या येथे प्रारंभ झाला.
● १८४८: महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स (यूएसए) येथे सुरू झाले. त्या नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.
● १९२८: हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून घेत त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवीन महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.
● १९४५: ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
● १९५६: भारतात भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली.
● १९५६: द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती झाली.
● १९५६: आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी ‘कुर्नुल’ ही त्याची राजधानी होती.
● १९५६: दक्षिण भारतामधीलकन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.
● १९५६: केरळ राज्याची स्थापना.
● १९५६: कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडू राज्यामध्ये हस्तांतरित करण्यात आला.
● १९६६: पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा या दोन राज्यात विभागणी झाली.
● १९६८: मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकाच्या फिल्म रेटिंग सिस्टीम या संस्थेची अधिकृतपणे सुरवात झाली.
● १९७३: मैसूर राज्याचे नाव बदलुन ते कर्नाटक असे केले गेले.
● १९७३: लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव बदलून त्यांना एकत्रितपणे ‘लक्षद्वीप’ असे ठेवण्यात आले.
● १९८२: अमेरिकेमध्ये मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी ‘होंडा’ ही पहिली आशियाई कंपनी बनली.
● १९९३: औपचारिकपणे युरोपियन युनियन ची स्थापना
● १९९४: मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक तथा लेखक दिनकर पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
● १९९९: सुप्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा ‘कबीर’ पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
● २०००: सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये (United Nations) प्रवेश झाला.
● २००५: योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार हाती घेतला.

● १८८८: चित्रकार, नेपथ्यकार तथा रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म.
● १८९३: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचा जन्म.
● १९१८: विनोदी अभिनेते शरद तळवळकर यांचा जन्म.
● १९२६: संगीत दिग्दर्शक, कवी, ‘शब्दप्रधान गायकी’ चे लेखक यशवंत देव यांचा जन्म.
● १९३२: कवी अरुण कोलटकर यांचा जन्म.
● १९४०: भारताचे पस्तीसावे सरन्यायाधीश रमेशचंद्र लाहोटी यांचा जन्म.
● १९४५: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म.
● १९६३: भारतीय उद्योजीका नीता अनिल अंबानी यांचा जन्म.
● १९७३: सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचा जन्म.
● १९७४: क्रिकेटपटू वी.वी.एस. लक्ष्मण यांचा जन्म.

● १८७३: बंगाली नाटककार दीनबंधू यांचे निधन.
● १९५०: जगविख्यात बंगाली साहित्यिक बितीभूषण बंदोपाध्याय यांचे निधन.
● १९८८: ज्येष्ठ कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन.
● १९९१: संगीतकार तथा संगीत संयोजक अरुण पौडवाल यांचे निधन.
● १९९३: ठुमरी, दादरा तथा गझल गायिका नैनोदेवी यांचे निधन.
● १९९४: शेती व पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.
● १९९६: श्रीलंका चे दुसरे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचे निधन.
● २००७: भारतीय दिग्दर्शक व पटकथा लेखक एस. अलीरझा यांचे निधन.

मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रविवार3101724
सोमवार4111825
मंगळवार5121926
बुधवार6132027
गुरुवार7142128
शुक्रवार18152229
शनिवार29162330
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group