दिनविशेष 2 नोव्हेंबर

पत्रकारांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी दंडमुक्ती समाप्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस

● 1914 : ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध रशियाने युद्ध घोषित केले.
● 1936 : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने BBC टेलिव्हिजनची सेवा सुरू केली.
● 1936 : कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना.
● 1940 : ग्रीस आणि इटलीमध्ये युद्ध सुरू झाले.
● 1953 : पाकिस्तानच्या असेंब्लीने देशाला इस्लामिक ‘रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ हे नाव दिले.
● 1999 : दाक्षिणात्य पार्श्वगायक बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या ‘लता मंगेशकर पुरस्कार’ साठी निवड झाली.
● 2000 : Expedition 1 पहिल्या दीर्घ कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले. या दिवसापासून आजपर्यंत, स्थानकावर अंतराळात अखंड मानवी उपस्थिती अखंडित सुरू आहे
● 2022 : इथिओपियन सरकार आणि टायग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट यांच्यात शांतता करारावर स्वाक्षरी झाली आणि टायग्रे युद्ध संपले.

● 1470 : इंग्लंडचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (पाचवा)
● 1755 : फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचा जन्म.
● 1833 : होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेचे सहसंस्थापक महेन्द्र लाल सरकार यांचा जन्म.
● 1882 : महाराष्ट्रातील जादुगारांचे आचार्य डॉ.के.बी.लेले यांचा जन्म.
● 1886 : बांगलादेशी राजकारणी धीरेंद्रनाथ दत्ता यांचा जन्म.
● 1897 : दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, सोहराब मेहेरबानजी मोदी यांचा जन्म.
● 1921 : ध्वनिमुद्रणतज्ञ रघुवीर दाते यांचा जन्म.
● 1929 : बोस कॉर्पोरेशन चे संस्थापक अमर बोस यांचा जन्म.
● 1941 : केन्द्रीय मंत्री व पत्रकार अरुण शौरी यांचा जन्म.
● 1960 :  संगीतकार अनु मलिक यांचा जन्म.
● 1965 : अभिनेता व निर्माता शाहरुख खान यांचा जन्म.

● 1885 : मराठीतले पहिले श्रेष्ठ संगीत नाटककार, नट, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग किर्लोस्कर गुर्लहोसूर यांचे निधन.
● 1950 : नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन.
● 1954 : ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे यांचे निधन.
● 1984 : मराठी साहित्यिक शरद्चंद्र मुक्तिबोध यांचे निधन.
● 1990 : गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक भालचंद्र दिगंबर गरवारे यांचे निधन.
● 2012 : तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचे निधन.
● 2012 : भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन.

मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रविवार3101724
सोमवार4111825
मंगळवार5121926
बुधवार6132027
गुरुवार7142128
शुक्रवार18152229
शनिवार29162330
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group