
● 1831 : युनायटेड स्टेट्स (U.S.) च्या इतिहासातील सर्वात रक्तरंजित गुलाम बंडखोरीचे नेतृत्व केल्याबद्दल नॅट टर्नर याला अटक करण्यात आली.
● 1920 : ऑस्ट्रेलियाच्या कम्युनिस्ट पक्षाची सिडनी येथे स्थापना.
● 1928 : लाहोर येथे सायमन कमिशनला विरोध केल्याबद्दल लाला लजपत राय यांच्यावर ब्रिटीश पोलिसांनी लाठीचार्ज केला.
● 1945 : संयुक्त राष्ट्रांचा भारत देश सदस्य झाला.
● 1966 : शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे संपन्न झाला.
● 1973 : इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया एकमेकांशी जोडले गेले.
● 1995 : कॅनडातील क्यूबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतामध्ये जनतेने 50.6% विरुद्ध 49.4% असा मतांचा कल देत कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
● 2013 : सचिन तेंडुलकर यांनी आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.
● 1735 : अमेरिकेचे 2रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन अॅडॅम्स यांचा जन्म.
● 1887 : बंगाली साहित्यिक आणि संदेश या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक सुकुमार रॉय यांचा जन्म.
● 1909 : भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म.
● 1932 : भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म.
● 1947 : भारतीय चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांचा जन्म.
● 1949 : केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचा जन्म.
● 1951 : भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.
● 1960 : अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचा जन्म.
● 1883 : भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन.
● 1974 : गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचे निधन.
● 1990 : चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचे निधन.
● 1990 : अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन.
● 1994 : केन्द्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचे निधन.
● 1996 : लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण पाध्ये यांचे निधन.
● 1998 : लेखक व दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे निधन.
● 2005 : भारतीय राजकारणी शम्मीशेर सिंह शेरी यांचे निधन.
● 2011 : उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन.
मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇
ऑक्टोबर 2024