
दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकृत करून दिनांक 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. संविधानाचे महत्त्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे, जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्ये शालेय महाविद्यालयीन तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त सन 2024 25 या अमृत महोत्सवी वर्षात संविधान जागृत अमृत महोत्सव ‘घर घर संविधान’ साजरा करणे संदर्भात कळविले आहे.
त्या अनुषंगाने शालेय स्तरावर खालील उपक्रमांचे आयोजन दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ते दिनांक 26 जानेवारी 2025 या कालावधीत करावे. 👇👇👇
■ शाळा महाविद्यालय वसतीगृहे यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे.
■ शालेय परिपाठात तसेच वसतीगृहात प्रार्थनेत दररोज संविधान प्रस्ताविका उद्देशिकेचे वाचन विद्यार्थ्यांकडून करून घेणे.
■ शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रति विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देणे.
■ भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे जसे निर्मिती निर्मिती समिती अनुच्छेद विशेषता कर्तव्य यावर व्याख्यान (किमान 60 ते 90 मिनिट).
■ विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे हक्क आणि कर्तव्य यावर मार्गदर्शन करणे.
■ कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाची तत्त्वज्ञान आणि मूल्य समजावून सांगणे.
■ संविधान मूल्ये यावर पथनाट्य तयार करणे.
■ शाळा महाविद्यालयात संविधानाच्या विविध मुद्द्यांवर फलक पोस्टर आणि प्रदर्शन आयोजित करणे.
■ संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन यांचा समावेश करावा.
■ संविधानावर आधारित निबंध लेखन भाषण वादविवाद चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करावे.
■ प्रजासत्ताक दिनी संविधानातील मूल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व सादरीकरण (देशभक्तीपर गाणी नाटक आणि नृत्य सादर करावे).
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांच्याकडून 26 नोव्हेंबर संविधान दिली एक मॉडेल Diksha प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात येणार आहे. दिनांक 26/11/2024 रोजी संविधान दिन साजरा करण्यासाठी आणि त्यानंतरच्या उपक्रमांसाठी हे मॉड्युल संदर्भ म्हणून वापरण्यात यावे. तसेच PM EVidya प्लॅटफॉर्मवर संविधान दिनानिमित्त एक व्हिडिओ देखील अपलोड केला जाईल, तो व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा. त्याचप्रमाणे MyGov पोर्टलवर प्रश्नमंजुषा अपलोड केले जाईल, सर्व विद्यार्थी शिक्षक पालक परीक्षा यंत्रणेतील सर्वाधिकारी MyGov पोर्टलवर login करून सदर प्रश्न मंजुषा सोडवावी. तसेच सर्व शाळांनी आयोजित केलेले विविध उपक्रमांचे फोटो विविध व्हिडिओ काढून Geo Tagging कॅमेरा चा वापर करून MyGov पोर्टल वर अपलोड करावे.