
जागतिक दिन
जागतिक गरिबी निर्मूलन दिन
17 ऑक्टोबर रोजी घडलेल्या विशेष घटना
1888 : थॉमस एडिसन यांनी ‘ऑप्टिकल फोनोग्राफ’ म्हणजेच पहिल्या फिल्मसाठी पेटंट दाखल केले.
1917 : पहिल्या महायुद्धात इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्ब हल्ला केला.
1933 : अल्बर्ट आइनस्टाईन नाझी जर्मनी येथून पळून अमेरिकेत आले.
1943 : बर्मा रेल्वे – रंगून ते बँकॉक रेल्वे पूर्ण झाली.
1956 : इंग्लंडमध्ये जगातील पहिला व्यावसायिक अणुऊर्जा प्रकल्प सुरू झाला.
1979 : मदरतेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला.
1996 : अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास पुरस्कार जाहीर झाला.
1998 : आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1817 : भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचा जन्म. (मृत्यू : 27 मार्च 1898)
1869 : गायनाचार्य, भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक ‘पं. भास्करबुवा बखले यांचा जन्म. (मृत्यू : 8 एप्रिल 1922)
1892 : कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्म. (मृत्यू : 16 फेब्रुवारी 1968)
1917 : वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ तात्यासाहेब कोर यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 1994)
1947 : चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका सिम्मी गरेवाल यांचा जन्म.
1955 : अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 1986)
1965 : श्रीलंकेचे क्रिकेटपटू अरविंद डिसिल्व्हा यांचा जन्म.
1970 : भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांचा जन्म.
1772 : अफगणिस्तानचे राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) यांचे निधन.
1882 : इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन. (जन्म : 9 मे 1814)
1906 : जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली. (जन्म : 22 ऑक्टोबर 1873)
1981 : भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्नादासन यांचे निधन. (जन्म : 24 जून 1927)
1993 : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचे निधन. (जन्म : 12 मे 1907)
2008 : ललित लेखक रविन्द्र पिंगे यांचे निधन. (जन्म : 13 मार्च 1926)
मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇
ऑक्टोबर 2024