दिनविशेष 20 ऑक्टोबर

जागतिक सांख्यिकी दिन

1904 : चिली आणि बोलिव्हियाने आपापल्या सीमांचे सीमांकन करून शांतता करारावर स्वाक्षरी केली.
1947 : पाकिस्तान-अमेरिका यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
1952 : केनियात आणीबाणी जाहीर झाली, जोमो केन्याट्टा आणि इतर प्रमुख नेत्यांच्या अटकेचे सत्र सुरू झाले.
1962 : चीनने भारतावर आक्रमण केले व चीन-भारत युद्धाची ठिणगी पडली.
1969 : अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) स्थापना.
1970 : हरित क्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
1995 : ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स संस्थेकडून हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांना ‘मॅन ऑफ द सेंचुरी’ पुरस्काराने सन्मानित केले.
2017 : सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस ने रक्का मोहिमेत विजय घोषित केला
2022 : लिझ ट्रस यांनी ब्रिटनचे पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याचे पद सोडले

1855 : गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म.
1891 : अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल 1935 मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचा जन्म.
1893 : केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचा जन्म.
1916 : लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल’ यांचा जन्म.
1920 : भारतीय वकील आणि राजकारणी सिद्धार्थ शंकर रे यांचा जन्म.
1927 : भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म.
1963 : क्रिकेटपटू, समालोचक व खासदार नवजोत सिंग सिद्धू’ यांचा जन्म.
1978 : भारतीय फलंदाज वीरेन्द्र सहवाग यांचा जन्म.

1890 : ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचे निधन.
1961 : मानववंशशास्त्रज्ञ व्ही. एस. गुहा यांचे निधन.
1964 : अमेरिकेचे 31 वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचे निधन.
1974 : प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर यांचे निधन.
1984 : नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचे निधन.
1996 : पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक बंडोपंत गोखले यांचे निधन.
1999 : समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार माधवराव लिमये यांचे निधन.
2009 : गुप्तहेर कथा लेखक वीरसेन आनंदराव कदम यांचे निधन.
2010 : क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचे निधन.
2011 : लिबीयाचे हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचे निधन.
2012 : पृथ्वी दिनाची सुरवात करणारे जॉन मॅककनेल यांचे निधन.

मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रवि6132027
सोम7142128
मंगळ18152229
बुध29162330
गुरु310172431
शुक्र4111825
शनि5121926
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group