- भारतीय प्रजासत्ताक दिन
- आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन
- 1565: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.
- 1837: मिशिगन अमेरिकेचे 26 वे राज्य बनले.
- 1876: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे सेवा सुरू झाली.
- 1924: रशियातील सेंट पीटर्सबर्गचे नाव लेनिनग्राड असे ठेवले.
- 1942: दुसरे महायुद्ध – युरोपमधील उत्तर आयर्लंडमध्ये अमेरिकन सैन्याचे आगमन.
- 1949: भारतीय संविधानाचा पहिला मसुदा मंजूर झाला.
- 1950: भारताचे संविधान अस्तित्वात आल्यानंतर भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक बनला, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
- 1950: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
- 1965: भारताने हिंदीला आपली अधिकृत भाषा म्हणून घोषित केले.
- 1998: कॅप्टन लक्ष्मी आणि उषा मेहता यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आले.
- 2001: गुजरातच्या कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे 20,000 लोकांचा मृत्यू.
- 1891: ‘चंद्रशेखर शिवराम गोर्हे’ – बडोद्याचे राजकवी यांचा जन्म. (मृत्यू: 17 मार्च 1937)
- 1904: ‘शॉन मॅकब्राइड’ – नोबेल पुरस्कार, आयरिश रिपब्लिकन परराष्ट्र व्यवहार मंत्री यांचा जन्म.(मृत्यू : 15 जानेवारी 1988)
- 1918: ‘निकोला सीउसेस्कु’ – रोमेनियाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 25 डिसेंबर 1989)
- 1920: ‘वसंत नायसादराय रायजी’ – भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेट इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 13 जून 2020)
- 1921: ‘अकिओ मोरिटा’ – सोनी कार्पोरेशनचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑक्टोबर 1999)
- 1730: ‘कवी श्रीधर’ – यांनी समाधि घेतली.
- 1823: ‘एडवर्ड जेन्नर’ – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर यांचे निधन. (जन्म: 17 मे 1749)
- 1879: ‘जुलिया मार्गारेट कॅमेरॉन’ – भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार यांचे निधन. (जन्म: 11 जून 1815)
- 1919: ‘इस्माईल केमाली’ – अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 16 जानेवारी 1844)
- 1954: ‘मानवेंद्रनाथ रॉय’ – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 21 मार्च 1887)
- 1968: ‘माधव श्रीहरी अणे’ – लोकनायक यांचे निधन. (जन्म: 29 ऑगस्ट 1880)
- 2015: ‘रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण’ – व्यंगचित्रकार यांचे निधन. (जन्म: 24 ऑक्टोबर 1921)