- 1646: मराठी राज्याच्या राजमुद्रेचा वापर करून लिहिलेले शिवाजी महाराजांचे पहिले पत्र उपलब्ध.
- 1942: दुसरे महायुद्ध – जपानी सैन्याने शांघाय शहराचा ताबा घेतला.
- 1961: एच. एम. टी. वॉच फॅक्टरी, भारतातील पहिला घड्याळ कारखाना, बंगळुरूमध्ये उघडण्यात आला.
- 1977: मिर्झा हमीदुल्लाह बेग यांनी भारताचे 15 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
- 1986: चॅलेंजर स्पेस शटलचा उड्डाणानंतर 74 सेकंदात स्फोट झाला. ज्यामध्ये सर्व सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
- 1457: ‘हेन्री (सातवा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1509)
- 1865: ‘लाला लजपतराय’ – स्वातंत्र्यसेनानी यांचा जन्म. (मृत्यू: 17 नोव्हेंबर 1928)
- 1877: ‘पुलिन बिहारी दास’ – बंगाली क्रांतिकारक यांचा जन्म.
- 1899: ‘के. एम. करिअप्पा’ – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल यांचा जन्म. (मृत्यू: 15 मे 1993)
- 1925: ‘डॉ. राजा रामण्णा’ – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे 4 थे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 2004)
- 1930: ‘पं. जसराज’ – मेवाती घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म.
- 1932: ‘पृथीपाल सिंह’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
- 1937: ‘सुमन शंकर हेमाडी’ – चित्रपट व भावगीत गायिका यांचा जन्म.
- 1955: ‘निकोलस सारकोझी’ – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
- 1986: ‘श्रुती हासन’ – भारतीय चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
- 814: ‘शार्लेमेन’ – फ्रँकिश राजा यांचे निधन. (जन्म: 2 एप्रिल 747)
- 1547: ‘हेन्री (आठवा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 28 जून 1491)
- 1596: ‘फ्रान्सिस ड्रेक’ – एकाच मोहिमेत जगाची प्रदक्षिणा पूर्ण करणारे इंग्रजी एक्सप्लोरर यांचे निधन.
- 1616: ‘संत दासोपंत’ – समाधिस्थ झाले. (जन्म: 24 सप्टेंबर 1551)
- 1851: ‘बाजीराव पेशवे (दुसरे)’ – यांचे निधन. (जन्म: 10 जानेवारी 1775)
- 1984: ‘सोहराब मेहेरबानजी मोदी’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते यांचे निधन. (जन्म: 2 नोव्हेंबर 1897)
- 1996: ‘बर्न होगार्थ’ – अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1911)
- 1997: ‘डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे’ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ यांचे निधन. (जन्म: 27 जुलै 1911)
- 2007: ‘ओंकार प्रसाद नय्यर’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म: 16 जानेवारी 1926)