माहितीच्या सार्वत्रिक वापराचा आंतरराष्ट्रीय दिवस
- 1924 : पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.
- 1928 : सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.
- 1939 : दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- 1950 : इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- 1958 : फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले.
- 1960 : माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- 1971 : युनायटेड किंग्डमने औषधांचा गैरवापर कायदा काढून गांजाचे वैद्यकीय उपयोग बेकायदा ठरवले.
- 1999 : आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
- 2000 : नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर.
- 2008 : स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन 1 हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.
- 1803 : ‘प्रॉस्पर मेरिमी’ – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 सप्टेंबर 1870)
- 1836 : ‘थॉमस क्रैपर’ – बॉलकोक चे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 27 जानेवारी 1910)
- 1867 : ‘कीचिरो हिरानुमा’ – जपानी पंतप्रधान यांचा जन्म.
- 1898 : ‘शंकर रामचंद्र दाते’ – स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार यांचा जन्म.
- 1907 : ‘भगत सिंग’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मार्च 1931)
- 1909 : ‘पी. जयराज’ – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 11 ऑगस्ट 2000)
- 1925 : ‘सेमूर क्रे’ – अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1929 : ‘लता मंगेशकर’ – जगप्रसिद्ध पार्श्वगायिका यांचा जन्म.
- 1946 : ‘माजिद खान’ – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान यांचा जन्म.
- 1947 : ‘शेख हसीना’ – बांगलादेशच्या 10व्या पंतप्रधान यांचा जन्म.
- 1966 : ‘पुरी जगन्नाथ’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक यांचा जन्म.
- 1982 : ‘अभिनव बिंद्रा’ – ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय यांचा जन्म.
- 1982 : ‘रणबीर कपूर’ – चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
- 1895 : ‘लुई पाश्चर’ – रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 डिसेंबर 1822)
- 1935 : ‘विल्यम केनेडी डिक्सन’ – कायनेटोस्कोप चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 3 ऑगस्ट 1860)
- 1953 : ‘एडविन हबल’ – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 नोव्हेंबर 1889)
- 1956 : ‘विल्यम बोइंग’ – बोइंग विमान कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 1 ऑक्टोबर 1881)
- 1970 : ‘गमाल अब्दल नासर’ – इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
- 1981 : ‘रोम्लो बेटानको यु र्ट’ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
- 1989 : ‘फर्डिनांड मार्कोस’ – फिलिपाइन्सचे 10 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 11 सप्टेंबर 1917)
- 1991 : ‘माइल्स डेव्हिस’ – अमेरिकन जॅझ संगीतकार यांचे निधन.
- 1992 : ‘ग. स. ठोसर’ – पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर यांचे निधन.
- 1994 : ‘के. ए. थांगवेलू’ – भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन यांचे निधन. (जन्म : 15 जानेवारी 1917)
- 2000 : ‘श्रीधरपंत दाते’ – सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते यांचे निधन.
- 2004 : ‘डॉ. मुल्कराज आनंद’ – इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक यांचे निधन. (जन्म : 12 डिसेंबर 1905)
- 2012 : ‘एम. एस. शिंदे’ – चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक यांचे निधन.
- 2012 : ‘ब्रजेश मिश्रा’ – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे निधन. (जन्म : 29 सप्टेंबर 1928)