दिनविशेष 4 नोव्हेंबर

● १८९६ : पुणे डेक्कन सभेची स्थापना झाली.

● १९१८ : पहिले महायुद्धात – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली.

● १९२१ : जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या करण्यात आली.

● १९२२ : तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश मिळाले.

● १९४८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

● १९९६ : कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर झाला.

● २००० : हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर झाला.

● २००१ : हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर प्रदर्शित.

● २००८ : बराक ओबामा हे अमेरिकेचे प्रथम कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

● १६१८ : मुघल सम्राट औरंगजेबचा जन्म. 

● १८४५ : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचे एक आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके यांचा येथे जन्म. 

● १८७१ : मानववंश शास्त्रज्ञ शरदचंद्र रॉय यांचा जन्म.

● १८८४ : प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते जमनालाल बजाज यांचा जन्म.

● १८८४ : ट्रॅक्टरचे निर्माते हॅरी फर्ग्युसन यांचा जन्म.

● १८९४ : कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म.

● १८९७ : भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्माल यांचा जन्म.

● १९१६ : बार्बी बाहुलीच्या निर्मात्या रुथ हँडलर यांचा जन्म.

● १९२५ : चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक ऋत्विक घटक यांचा जन्म.

● १९२९ : शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचा जन्म.

● १९२९ : गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचा जन्म.

● १९३० : भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म.

● १९३४ : दिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म.

● १९३९ : चालते बोलते गणिती यंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलादेवी यांचा जन्म.

● १९५० : व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक निग पॉवेल यांचा जन्म.

● १९५५ : भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.

● १९७१ : अभिनेत्री तब्बू यांचा जन्म.

● १९८६ : भारतीय उद्योजक सुहास गोपीनाथ यांचा जन्म.

● १९७० : लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक पं. शंभू महाराज यांचे निधन.

● १९९१ : प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट यांचे निधन.

● १९९२ : मोटर-व्हीलचेअरचे निर्माते जॉर्ज क्लाईन यांचे निधन.

● १९९५ : इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते यित्झॅक राबिन यांचे निधन.

● १९९८ : हिंदी कवी नागार्जुन यांचे निधन.

● १९९९ : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचे निधन.

● २००५ : इतिहासकार, वृत्तपत्रकार, कोशकार स. मा. गर्गे यांचे पुणे येथे निधन झाले.

● २०११ : नाटककार व साहित्यिक दिलीप परदेशी यांचे निधन.

मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रविवार3101724
सोमवार4111825
मंगळवार5121926
बुधवार6132027
गुरुवार7142128
शुक्रवार18152229
शनिवार29162330
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group