दिनविशेष 16 ऑक्टोबर

जागतिक दिन : जागतिक अन्न दिन

🍁 1775 : ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या राज्यामधील पोर्टलँड हे शहर जाळले.
🍁 1793 : फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा 16 वा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा वध करण्यात आला.
🍁 1868 : डेन्मार्ककडून निकोबार बेटांचे सर्व अधिकार ब्रिटीशांना विकण्यात आले.
🍁 1905 : व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन ने बंगालच्या फाळणीचा आदेश दिला.
🍁 1923 : वॉल्ट डिस्ने कंपनीची स्थापना केली.
🍁 1949 : ग्रीक कम्युनिस्ट पक्षाने तात्पुरता युद्धविराम जाहीर केला आणि ग्रीक गृहयुद्ध संपले.
🍁 1951 : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या झाली.
🍁 1978 : माउंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी पहिली युरोपियन महिला – वांडा रुटकिएविझ ही ठरली.
🍁 1995 : स्कॉटलंडमधील स्काय ब्रिज उघडण्यात आला.
🍁 1999 : स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठी यांना देण्यात आला.

🔖 1670 : शिख सेनापती – बंदा सिंग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू : 9 जून 1716)
🔖 1841 : जपानचे पहिले पंतप्रधान – इटो हिरोबुमी यांचा जन्म. (मृत्यू : 26 ऑक्टोबर 1909)
🔖 1844 : अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान – इस्माईल क्यूम्ली यांचा जन्म.
🔖 1886 : इस्राईल देशाचे पहिले पंतप्रधान- डेव्हिड बेन-गुरीयन यांचा जन्म.
🔖 1890 : वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक – अनंत हरी गद्रे यांचा जन्म. (मृत्यू : 3 सप्टेंबर 1967)
🔖 1896 : स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक – सेठ गोविंद दास यांचा जन्म. (मृत्यू : 18 जून 1974)
🔖 1907 : कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांचा जन्म. (मृत्यू : 4 ऑक्टोबर 1982)
🔖 1948 : अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक – हेमा मालिनी यांचा जन्म.
🔖 1949 : भारतीय अभिनेते, पटकथालेखक आणि नाटककार – क्रेझी मोहन यांचा जन्म.
🔖 1959 : मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष – अजय सरपोतदार यांचा जन्म. (मृत्यू : 3 जून 2010)
🔖 1982 : भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माता – पृथ्वीराज सुकुमारन यांचा जन्म.
🔖 2003 : ‘नेपाळची राजकन्या कृत्तिका यांचा जन्म.

💢 1793 : फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचे निधन. (जन्म : 2 नोव्हेंबर 1755)
💢 1799 : भारतीय स्वातंत्र्यसैनिक वीरपदिया कट्टाबोम्मन यांचे निधन. (जन्म : 3 जानेवारी 1760)
💢 1905 : आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुन्द्री यांचे निधन. (जन्म : 3 सप्टेंबर 1855)
💢 1944 : उद्योजक, प्रभाकर कंदिलचे निर्माते गुरुनाथ प्रभाकर ओगले’₹ यांचे निधन.
💢 1948 : नाटककार माधव नारायण जोशी यांचे निधन.
💢 1950 : अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक – दादासाहेब केतकर यांचे निधन.
💢 1951 : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या.
💢 1997 : मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.
💢 2002 : लेखक नागनाथ संतराम इनामदार यांचे निधन. (जन्म : 23 नोव्हेंबर 1923)
💢 2013 : भारतीय नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांचे निधन.


मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रवि6132027
सोम7142128
मंगळ18152229
बुध29162330
गुरु310172431
शुक्र4111825
शनि5121926
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group