दिनविशेष 2 ऑक्टोबर

जागतिक दिन :
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन


2 ऑक्टोबर दिनविशेष – घटना :
1909 : रमाबाई रानडे यांनी पुणे येथे सेवासदन संस्थेची स्थापना केली.
1925 : जॉन लोगी बेयर्ड यांनी पहिला दूरदर्शन संच बनवला.
1955 : पेरांबूर (तामिळनाडू) येथे इंटिग्रल कोच फॅक्टरी सुरू झाली.
1958 : गिनी गणराज्यास फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
1967 : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायमूर्ती म्हणून थुरगुड मार्शल यांनी पदभार स्वीकारला.
1969 : RBI ने महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीनिमित्त महात्मा गांधींची प्रतिमा आणि स्वाक्षरी असलेल्या नोटा जारी केल्या.


2 ऑक्टोबर दिनविशेष – जन्म :
1847 : जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचा जन्म.
1869 : पोरबंदर गुजरात येथे महात्मा गांधी – मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म.
1891 : पद्मश्री विजेते तथा शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर – यांचा जन्म.
1904 : भारतरत्न ‘लालबहादूर शास्त्री’ यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू : 11 जानेवारी 1966)
1908 : विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचा जन्म. (मृत्यू : 1 डिसेंबर 1988)
1927 : शास्त्रीय गायक पं. दिनकर कैकिणी यांचा जन्म. (मृत्यू : 23 जानेवारी 2010)
1939 : भारतीय क्रिकेटपटू बुद्धी कुंदर यांचा जन्म. (मृत्यू : 23 जून 2006)
1942 : चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म.
1948 : अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचा मुंबई येथे जन्म. (मृत्यू : 18 ऑगस्ट 1998)
1968 : झेक लॉन टेनिस खेळाडू याना नोव्होत्‍ना यांचा जन्म.
1971 : संगीतकार व गायक कौशल इनामदार यांचा जन्म.


2 ऑक्टोबर दिनविशेष – मृत्यू :

1906 : चित्रकार राजा रविवर्मा यांचं निधन. (जन्म : 29 एप्रिल 1848)
1927 : स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्‍हेनिअस यांचं निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1859)
1975 : स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री के. कामराज यांचं निधन. (जन्म : 15 जुलै 1903)
1985 : अमेरिकन अभिनेते रॉक हडसन’ यांचं निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 1925)


मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रवि6132027
सोम7142128
मंगळ18152229
बुध29162330
गुरु310172431
शुक्र4111825
शनि5121926
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group