दिनविशेष 24 नोव्हेंबर

जागतिक जुळे दिवस

  • 1434: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.
  • 1750: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजाराम कैद.
  • 1859: चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारे त्यांचे जगप्रसिद्ध पुस्तक ओरिजिन ऑफ द स्पीसीज प्रकाशित केले.
  • 1864: जळगाव नगरपालिकेची स्थापना झाली.
  • 1944: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानांनी टोकियोवर बॉम्ब टाकला.
  • 1976: तुर्कस्तानच्या पूर्व भागात तीव्र भूकंप. यामध्ये 4 ते 5 हजार लोकांचा मृत्यू झाला.
  • 1992: साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कवी विंदा करंदीकर यांची कोणार्क पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • 1992: हैदराबाद विद्यापीठाचे प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना वैज्ञानिक संशोधनासाठी जी.डी. बिर्ला पुरस्कार जाहीर झाला.
  • 1992: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर झाला.
  • 1996: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुखर्जी स्मृती पुरस्कार प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर झाला.
  • 1998: सामाजिक कार्यकर्त्यांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीच्या नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान करण्यात आला.
  • 2000: परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग यांनी जाहीर केले की भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या 545 किमी विभागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आली.
  • 2022 – सार्वत्रिक निवडणुकांच्या पाच दिवसांनंतर ज्याचा परिणाम त्रिशंकू संसदेत झाला, विरोधी पक्षनेते आणि माजी उपपंतप्रधान अन्वर इब्राहिम यांना मलेशियाचे 10 वे पंतप्रधान म्हणून अधिकृतपणे नाव देण्यात आले.
  • 1806: ‘विल्यम वेबल एलिस’ – रग्बी फुटबॉलचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 24 जानेवारी 1872)
  • 1877: ‘कावसजी जमशेदजी पेटीगरा’ – भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर यांचा जन्म.
  • 1894: ‘हर्बर्ट सटक्लिफ’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1978)
  • 1914: ‘लिन चॅडविक’ – ब्रिटिश शिल्पकार यांचा जन्म. (मृत्यू: 25 एप्रिल 2003)
  • 1937: ‘केशव मेश्राम’ – मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक यांचा जन्म.
  • 1941: ‘पेट बेस्ट’ – भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार यांचा जन्म.
  • 1945: ‘माँटेक सिंग अहलुवालिया’ – भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि नागरी सेवक यांचा जन्म.
  • 1955: ‘इयान बोथम’ – इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1961: ‘अरुंधती रॉय’ – बुकर विजेत्या भारतीय लेखिका यांचा जन्म.
  • 1675: ‘गुरू तेग बहादूर’ – शिखांचे नववे गुरू यांचे निधन. (जन्म: 1 एप्रिल 1621)
  • 1916: ‘हिराम मॅक्सिम’ – मॅक्सिम तोफेचे शोधक यांचे निधन. (जन्म: 5 फेब्रुवारी 1840)
  • 1948: ‘अॅन्ना जर्व्हिस’ – मदर्स डे च्या संस्थापिका यांचे निधन. (जन्म: 1 मे 1864)
  • 1963: ‘मारोतराव कन्नमवार’ – महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री यांचे निधन. (जन्म: 10 जानेवारी 1900)
  • 1963: ‘ली हार्वे ओस्वाल्ड’ – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी यांचे निधन. (जन्म: 18 ऑक्टोबर 1939)
  • 2003: ‘टुनटुन’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1923)
  • 2004: ‘आर्थर हेली’ – जगप्रसिद्ध लेखक यांचे निधन. (जन्म: 5 एप्रिल 1920)
  • 2014: ‘मुरली देवरा’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म: 10 जानेवारी 1937)
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group