दिनविशेष 3 ऑक्टोबर

3 ऑक्टोबर दिनविशेष –

घटना :
1670 : शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. (दुसर्‍यांदा )
1778 : जेम्स कूक (ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन) अलास्का येथे पोहोचले.
1932 : युनायटेड किंग्डमपासुन इराकला स्वातंत्र्य मिळाले.
1935 : जनरल डी. बोनो यांच्या नेतृत्वाखाली इथिओपियाचा पाडाव झाला.
1942 : जर्मन व्ही-2 रॉकेट विक्रमी (85 किलोमीटर) उंचीवर पोहोचले.
1949 : युनायटेड स्टेट्समधील पहिले कृष्णवर्णीय मालकीचे रेडिओ स्टेशन – ‘WERD’ अटलांटा येथे उघडले.
1952 : युनायटेड किंग्डमने अण्वस्त्राची यशस्वी चाचणी करून ते जगातील तिसरे अण्वस्त्रधारी राष्ट्र बनले.

3 ऑक्टोबर दिनविशेष – जन्म :
1903 : हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ – स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म. (मृत्यू : 22 जानेवारी 1972)
1907 : निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक – नरहर शेषराव पोहनेरकर यांचा जन्म. (मृत्यू : 2 सप्टेंबर 1990)
1919 : अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन नोबेल पारितोषिक विजेते (1986) यांचा जन्म. (मृत्यू : 9 जानेवारी 2013)
1921 : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचा जन्म. (मृत्यू : 23 जून 1996)
1947 : सबवे रेस्टॉरंट चे सहसंस्थापक – फ्रेड डेलुका यांचा जन्म. (मृत्यू : 14 सप्टेंबर 2015)
1949 : चित्रपट दिग्दर्शक – जे. पी. दत्ता यांचा जन्म.

3 ऑक्टोबर दिनविशेष – मृत्यू :
1867 : शिवणयंत्राचे संशोधक – एलियास होवे यांचे निधन. (जन्म : 9 जुलै 1819)
1891 : फ्रेन्च गणिती – एडवर्ड लूकास यांचे निधन. (जन्म : 4 एप्रिल 1842)
1959 : विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक – दत्तात्रय तुकाराम बांदेकर यांचे निधन. (जन्म : 22 सप्टेंबर 1909)
1995 : भारतीय लेखक व राजकारणी – मायलापुर पोन्नुसामी शिवगनम यांचे निधन. (जन्म : 26 जुन 1906)
1999 : सोनी कार्पोरेशनचे संस्थापक – अकिओ मोरिटा यांचे निधन. (जन्म : 26 जानेवारी 1921)
2007 : भारतीय पत्रकार, लेखक – एम. एन. विजयन यांचे निधन. (जन्म : 8 जून 1930)
2012 : सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर – केदारनाथ सहानी यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1926)


मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रवि6132027
सोम7142128
मंगळ18152229
बुध29162330
गुरु310172431
शुक्र4111825
शनि5121926
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group