आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिन
- 1861 : अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा पद्धत रद्द करण्यात आली.
- 1914 : ओहायोमध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले.
- 1962 : नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर 1990 मध्ये त्यांची सुटका झाली.
- 1962 : कन्या नक्षत्रात पहिल्या क्वासार तार्याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.
- 1965 : पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.
- 1994 : इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमी तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.
- 1997 : दोन रशियन अंतराळवीरांना घेऊन एक सोयुझ-यू अंतराळयान मीर अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले.
- 1997 : फ्रेंच ओपन लॉन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावणाऱ्या महेश भूपतीला क्रीडा विभागाकडून 2 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- 2024 : बांगलादेश प्रधानमंत्री शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावे लागले.
- 1858 : ‘वासुदेव वामन खरे’ – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जून 1924)
- 1890 : ‘महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार’ – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1979)
- 1930 : ‘नील आर्मस्ट्राँग’ – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑगस्ट 2012)
- 1933 : ‘विजया राजाध्यक्ष’ – लेखिका व समीक्षिका यांचा जन्म.
- 1950 : ‘महेंद्र कर्मा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मे 2013)
- 1969 : ‘वेंकटेश प्रसाद’ – जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
- 1972 : ‘अकिब जावेद’ – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
- 1974 : ‘काजोल’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
- 882 : 882ई.पुर्व : ‘लुई (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन.
- 1962 : ‘मेरिलीन मन्रो’ – अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 1 जून 1926)
- 1984 : ‘रिचर्ड बर्टन’ – अभिनेता यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1925)
- 1991 : ‘सुइचिरो होंडा’ – होंडा कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 1906)
- 1992 : ‘अच्युतराव पटवर्धन’ – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1905)
- 1997 : ‘के. पी. आर. गोपालन’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
- 2000 : ‘लाला अमरनाथ भारद्वाज’ – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व भारताचे पहिले शतकवीर यांचे निधन.
- 2001 : ‘ज्योत्स्ना भोळे’ – गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 11 मे 1914)
- 2014 : ‘चापमॅन पिंचर’ – भारतीय-इंग्रजी इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1914)