
● १८१७ : इंग्रजांकडून दुसरे बाजीरावाच्या सैन्याचा लढाईत पराभव झाला.
● १८२४ : अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.
● १८४३ : विष्णुदास भावे स्वरचित सीता स्वयंवर या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथे सदर झाला.
● १८७२ : महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड ठोठावण्यात आला.
● १८९५ : जॉर्ज बी. सेल्डेन यांना ऑटोमोबाइलसाठी अमेरिकेचे पहिले पेटंट भेटले.
● १९२९ : जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून ते पुणे लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.
● १९४० : फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती ठरले.
● १९४५ : कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
● १९५१ : बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन पश्चिम रेल्वेची स्थापना करण्यात आली.
● २००६ : इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
● २००७ : गुगलने ने Android मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.
● २०१३ : भारताने ‘मंगळ ऑर्बिटर’ या मोहिमेची सुरूवात केली.
● १८७० : स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म.
● १८८५ : अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचा जन्म.
● १८९२ : इंग्रजी-भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे यांचा जन्म.
● १९०५ : भारतीय लेखक आणि कवी सज्जनद झहीर यांचा जन्म.
● १९०८ : तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. राजा राव यांचा जन्म.
● १९१३ : ब्रिटिश अभिनेत्री विवियन लेह यांचा जन्म.
● १९१७ : स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचा जन्म.
● १९२१ : ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे प्रमुख व संगीत नाटक कलावंत व गायक भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
● १९२९ : गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचा जन्म.
● १९३० : भारतीय नेते अर्जुनसिंह यांचा जन्म.
● १९३२ : पक्षी, वन्याजीवनविषयक ग्रंथकार मारुती चितमपल्ली यांचा सोलापूर येथे जन्म.
● १९५२ : भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक वंदना शिवा यांचा जन्म.
● १९५५ : पत्रकार करन थापर यांचा जन्म.
● १९८८ : क्रिकेटपटू विराट कोहोली यांचा जन्म.
● १८७९: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन.
● १९१५ : राष्ट्रीय सभेचे संस्थापक व मुंबईचा सिंह उर्फ फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचे निधन
● १९५० : चतुरंग गवई फय्याझ खाँसाहेब यांचे निधन.
● १९९१ : कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन.
● २०११ : संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन.
मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇
नोव्हेंबर 2024