1543 : नऊ महिने वयाची मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी बनली.
1791 : वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.
1839 : जॉन हर्षेल याने जगातील पहिले छायाचित्र घेतले.
1850 : कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे 31वे राज्य बनले.
1939 : प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.
1945 : दुसरे चीन जपान युद्ध, जपानने चीनसमोर शरणागती पत्करली.
1985 : मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.
1990 : श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे 184 तामिळींची हत्या केली.
1991 : ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.
1994 : स्पेस शटल प्रोग्राम : STS-64 वर स्पेस शटल डिस्कव्हरी लाँच करण्यात आली.
1997 : 7 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.
2001 : व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.
2006 : स्पेस शटल प्रोग्राम : स्पेस शटल अटलांटिस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे एकत्रीकरण पुन्हा सुरू करण्यासाठी STS-115 वर प्रक्षेपित करण्यात आले. 2003 मध्ये कोलंबिया आपत्तीनंतरची ही पहिली ISS असेंब्ली मिशन आहे
2009 : दुबई मेट्रो, अरबी द्वीपकल्पातील पहिले शहरी रेल्वे नेटवर्क, समारंभपूर्वक उद्घाटन झाले.
2012 : सलग 21 यशस्वी PSLV प्रक्षेपणांच्या मालिकेत भारतीय अंतराळ संस्थेने आतापर्यंतचा सर्वात वजनदार परदेशी उपग्रह प्रक्षेपण केले.
2015 : एलिझाबेथ (दुसरी) युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली.
2016 : उत्तर कोरियाने पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली आहे.