ठरलं, या तारखेला होणार विधानसभा निवडणुका

निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर राज्यात आता आचारसंहिता सुरू झाली आहे. 26 नोव्हेंबरन 2024 रोजी विद्यमान विधानसभेची मुदत संपत आहे. त्या अगोदर नवीन सरकार बनणार आहे. 288 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व आयोगाच्या सदस्यांनी आज दुपारी विज्ञान भवन येथे पत्रकार परिषद घेत ही माहिती जाहीर केली. ती पुढील प्रमाणे –

■ अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर

■ अर्ज छाननी 30 ऑक्टोबर

■ अर्ज मागे घेणे 4 नोव्हेंबर

■ मतदान 20 नोव्हेंबर

■ मतमोजणी 23 नोव्हेंबर

निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता राजकीय हालचालींना खरा वेग येणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 1 लाख 186 मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर दिनांक 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केले जातील. महाराष्ट्रात एकूण 9 कोटी 63 लाख मतदार आहेत. मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या मतदारासाठी घरातून मतदानाची सुविधा दिली जाणार आहे. मतदानादिवशी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी निवडणूक आयोगाकडून करण्यात आले.

महाराष्ट्र सोबतच झारखंडमध्ये देखील निवडणूक कार्यक्रम जाही झाला आहे.

Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group