1216 : इंग्लंडचा राजा जॉन मरण पावला आणि सिंहासनावर त्याचा 9 वर्षांचा मुलगा ‘हेन्री’ बसला.
1791 : स्वीडन आणि रशिया यांच्यादरम्यान ड्रॉटनिंगहोमचा करार झाला.
1812 : नेपोलियन बोनापार्ट याने मॉस्कोमधून माघार घेतली.
1914 : यप्रेसची पहिली लढाई सुरू झाली. (पहिले महायुद्ध)
1933 : लीग ऑफ नेशन्समधून जर्मनी बाहेर पडला.
1935 : इथिओपियावर आक्रमण केल्याबद्दल इटलीवर लीग ऑफ नेशन्सने आर्थिक निर्बंध लादले.
1944 : युनायटेड स्टेट्सचे सैन्य फिलीपिन्समध्ये उतरले. (दुसरे महायुद्ध)
1970 : भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले.
1987 : युनायटेड स्टेट्स नेव्हीने पर्शियन गल्फमधील दोन इराणी तेल प्लॅटफॉर्मवर हल्ला. (ऑपरेशन निंबल आर्चर)
1993 : पुण्याजवळील महारेडिओ टेलिस्कोप (GMRT) प्रकल्पाचे संस्थापक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरूप यांना सर सी. व्ही. रमण पदक जाहीर.
2000 : पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्य सरकारचा गीत सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारा प्रदान.
2005 : सद्दाम हुसेनवर बगदादमध्ये मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी खटला सुरू करण्यात आला.
1902 : कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर यांचा जन्म. (मृत्यू : 31 मे 1973 – हैदराबाद, आंध्र प्रदेश)
1910 : तार्यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी 1983 मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 1995)
1920 : कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑक्टोबर 2003)
1922 : मराठी कवी आणि लेखक शांता शेळके यांचा जन्म.
1925 : वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉ. वामन दत्तात्रय वर्तक यांचा जन्म. (मृत्यू : 17 एप्रिल 2001)
1936 : गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म. (मृत्यू : 11 जुलै 2009)
1954 : रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया तेंडुलकर’ यांचा जन्म. (मृत्यू : 19 सप्टेंबर 2002)
1961 : अभिनेते सनी देओल यांचा जन्म.
1216 : इंग्लंडचा राजा जॉन यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1166)
1934 : ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचे निधन. (जन्म : 24 डिसेंबर 1864)
1937 : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1871)
1986 : मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचे निधन. (जन्म : 29 सप्टेंबर 1933)
1950 : पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर केतकर यांचे निधन. (जन्म : 9 एप्रिल 1887)
1995 : बाल कलाकार व अभिनेत्री सलमा बेग ऊर्फ कुमारी नाझ यांचे निधन.
2011 : भारतीय लेखक कक्कणदन यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1935)