दिनविशेष 22 ऑक्टोबर

 

1797 : बलून मधून 1000 मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन हा जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.

1859 : मोरोक्कोविरुद्ध स्पेनने युद्ध घोषित केले.

1927 : निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह एकूण सहा नवीन शोध लावले.

1938 : चेस्टर कार्लसन यांनी जगातील पहिले झेरॉक्स मशीन बनवले.

1963 : पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

1964 : फ्रेन्च लेखक व थोर तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.

1975 : सोव्हिएत मानवविरहित स्पेस मिशन व्हेनेरा 9 शुक्र ग्रहावर उतरले.

1994 : भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर केला.

2008 : भारताने पहिल्या मानव विरहित चांद्रयान 1 चे प्रक्षेपण केले.

1689 : पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचा जन्म.

1873 : अमृतानुभवी संत तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ स्वामी रामतीर्थ यांचा जन्म. 

1900 : भारतीय स्वातंत्र्यसैनिक अश्फाक़ुला खान यांचा जन्म.

1931 : जयपूरचा महाराजा भवानी सिंग यांचा जन्म.

1937 : चित्रपट अभिनेता, पटकथा आणि संवाद लेखक कादर खान यांचा जन्म

1942 : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघूवीर सिंह यांचा जन्म.

1947 : भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक दीपक चोप्रा यांचा जन्म.

1952 : भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ ए.एस. किरण कुमार यांचा जन्म.

1964 : भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जन्म.

1988 : भारतीय अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा जन्म.

1978 : साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम फडके यांचे निधन. 

1991 : देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक ग. म. सोहोनी यांचे निधन.

1998 : हिंदी चित्रपटांतील खलनायक अजित खान यांचे निधन.

2000 : अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया यांचे निधन.

2014 : भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन.

मागील दिवसांचे दिनविशेष पाहण्यासाठी कॅलेंडर वरील तारीख निवडा 👇👇👇

रवि6132027
सोम7142128
मंगळ18152229
बुध29162330
गुरु310172431
शुक्र4111825
शनि5121926
Scroll to Top
WhatsApp Group Floating Button     WhatsApp Group Logo Join Our Group