1859: ‘माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन’ – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1779)
1908: ‘कन्हय्यालाल दत्त’ – बंगालमधील क्रांतिकारक यांना फाशी.
1910: ‘लिओ टॉलस्टॉय’ – रशियन साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 9 सप्टेंबर 1828)
1954: ‘क्लाइड व्हर्नन सेसेना’ – सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 5 डिसेंबर 1879)
1970: ‘यशवंत खुशाल देशपांडे ‘ – ख्यातनाम मराठी संशोधक यांचे निधन. (जन्म: 14 जुलै 1884)
1973: ‘केशव सीताराम ठाकरे’ – पत्रकार व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 17 सप्टेंबर 1885)
1984: ‘फैज अहमद फैज’ – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर यांचे निधन. (जन्म: 13 फेब्रुवारी 1911)
1989: ‘हिराबाई बडोदेकर’ – किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका यांचे निधन. (जन्म: 19 मे 1905)
1997: ‘शांताराम शिवराम सावरकर’ – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक यांचे निधन.
1998: ‘दत्तात्रेयशास्त्री तांबे गुरूजी’ – संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक यांचे निधन.
2003: ‘डेव्हिड डेको’ – सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 24 मार्च 1930)
2007: ‘इयान स्मिथ’ – रोडेशिया देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 8 एप्रिल 1919)