● सर्वप्रथम यु-डायस प्रणालीवरील स्टुडंट पोर्टलवर लॉगिन करा 👇👇 (link)
https://sdms.udiseplus.gov.in/p0/v1/login?state-id=127
● लॉगिन केल्यावर current academic year 2024-25 निवडा 👇

APAAR Module वर क्लिक करा 👇

इयत्ता आणि तुकडी निवडा 👇

विद्यार्थ्याच्या नावासमोरील ॲक्शन कॉलम मधील Generate बटनावर क्लिक करा 👇👇

संबंधित विद्यार्थ्याची सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा. आधार कार्ड आणि आपल्या रेकॉर्ड ची माहिती जुळली पाहिजे. आधार कार्ड वर दुरुस्ती असल्यास तात्काळ आधार सेंटर ला भेट देऊन दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करावा. यु डायस पोर्टलवरील दुरुस्ती करण्यासाठी आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

माहिती अचूक असल्याची खात्री केल्यानंतर खाली असलेल्या फॉर्म मध्ये सर्व माहिती भरावी..
● पालकाचे पूर्ण नाव (ओळखपत्रावर आहे तसे)
● त्यांचे विद्यार्थ्याशी असलेले नाते (आई/वडील/पालक)
● पालकाचे ओळखपत्र प्रकार (आधार/पॅन/मतदान ओळखपत्र/ पासपोर्ट)
● ओळखपत्र क्रमांक

खाली scroll करून स्थळ व दिनांक लिहावा. व शेवटी असलेल्या Submit बटनवर क्लिक करावे. 👇

त्यानंतर अशी 👇 window ओपन होईल. त्यावरील Confirm बटनावर क्लिक करावे.

APAAR ID तयार होण्याची प्रक्रिया सुरू होईल.. 👇

वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सदर विद्यार्थ्याचा APAAR ID तयार होईल.

अशा पध्दतीने आपण आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे APAAR ID दोन मिनिटात बनवू शकता.
विद्यार्थ्यांचा APAAR ID बनवण्याअगोदर त्याच्या पालकाचे समंतीपत्र भरून घ्या.
संमती पत्र नमुना डाउनलोड करा.
संमतीपत्रात विद्यार्थी ज्या पालकांची (आई/वडील/पालक) माहिती भरून आणतील त्यांचीच माहिती ऑनलाइन APAAR ID काढताना पोर्टलवर भरून ठेवायची आहे.
हे भरून आणलेले समंतीपत्रक मुख्याध्यापक यांनी शाळेत जतन करून ठेवायचे आहेत.
APAAR ID काय आहे थोडक्यात जाणून घ्या.
👇