
एका झाडाच्या फांदीवर एक लहानसा कोळी राहत होता. तो रोज आपले जाळे विणायचा आणि सावज पकडून पोट भरायचा. एके दिवशी, सोसाट्याचा वारा सुटला आणि त्याचे जाळे तुटून गेलं.
कोळीने धीर धरला आणि पुन्हा जाळं विणायला घेतलं. पण पुन्हा जोरदार वारा सुटला आणि त्याचं नवं जाळंही उध्वस्त झालं. असे तीन-चार वेळा घडले.
शेवटी, झाडावर बसलेला एक पक्षी म्हणाला, “अरे कोळ्या, इतक्या वेळा तुझे जाळे तुटले, आता तरी तू हार मानशील का?”
कोळी हसला आणि म्हणाला, “जिथे प्रयत्न असतो, तिथे यश मिळतंच. मी माझं जाळं पुन्हा विणेन!”
अखेर, कोळीने जास्त मजबूत जाळं विणलं आणि त्या दिवशी वारा सुटूनही ते तुटलं नाही. कोळीच्या जिद्दीने त्याला यश मिळालं!
तात्पर्य :
प्रयत्न करणारा कधीच अपयशी ठरत नाही!